तिर्थक्षेत्र रानअंत्री संजिवन समाधि

श्रीमत्‍परमहंस भगवान परमानंद नारायण सरस्‍वतींचे सन 1896 मध्‍ये रानअंत्री येथे आगमन झाले. अंत्री समाधिस्‍थाना पासुन जवळ असलेल्‍या जांभोरा गावी येलोजी महाराज यांची पुरातन समाधी आहे व जवळच नवनाथांच्‍या जागृत समाध्‍या आहे किल्‍ले वजा पुरातन पध्‍दतीचे मुघल घाटणी चे मंदिर असुन तया मध्‍ये श्रीमत्‍परमहंस परमानंद यांचे वास्‍तव असे अंत्री गावाचे दगडोजी पाटील हे नियमित मस्‍तकी श्रीचे दर्शनास घोडयावरुन जात असत.

एके दिवशी त्‍यांनी श्रींचे चरण कमल मस्‍तकी घेऊन अंत्री येथे येण्‍याची कळकळीची विनंती केली ती मान्‍य करुन सन 1896 मध्‍ये अंत्री येथे पुज्‍यपाद शिष्‍य समावेत भगवान परमानंद आले. त्‍याच्‍या सह पुज्‍यपाद शिष्‍य तातोबानंद प्रेमानंद रामानंद पुर्णानंद कृष्‍णानंद केशवानंद हे सन्‍यस्‍त परिव्राजकाचार्य शिष्‍य होत. अंत्री ग्रामिण मठ स्‍थापन करुन त्‍यांनी अनेक निवास साधना मार्गास लावले 13 वर्षे काळात सदभक्‍तांना त्‍यांचे यौगिक व आध्‍यामिक दिव्‍य अनुभव आले.

मुख्‍यत्‍वे करुन लघीम सिध्‍दी देहा हिस जडत्‍व कमी करुन लघीम म्‍हणजे कापुस त्‍या प्रमाणे देह हलका करुन भुमीस स्‍पर्श न करता वायुमार्गे गमन करणे या झाडावरुन त्‍या झाडावर हनमंताप्रमाणे संचार करणे त्‍यांच्‍या दिव्‍य देह कधी अत्‍यंत कर तर कधी भरदार सुदृढ दिसे उच्‍चतम योगाभ्‍यासाने व सोहंसिध्‍दीने हे प्राइज़ होते. असे दिव्‍य अनुभव अंत्री व इतरत्र ग्रामस्‍तांना आले प्रावाहोन भगवान परमानंदाची किर्ती दुर वर पसरली व सदभक्‍तांची दिघ लागतो अनेक राज्‍यातून काश्मिर बंगला येथुन शिष्‍य परिवार अंत्री येथे येत त्‍यात उच्‍चशिक्षीत व राजघराण्‍यातील लोक होते. तसे अगदी सामान्‍य लोक असत अंत्री येथे 13 वर्षे वास्‍तव्‍यात दगडोजी पाटील विवर्तले व तातोबानंद यांनी श्रींचे हस्‍ते अंत्री येथे समाधी धारण केली स्‍वामी पुर्णानंद यादवानंद बाळानंद केशवानंद कृष्‍णानंद यांना हिमालयात जाझयाचा श्रींनी आदेश दिला व सन 1910 मध्‍ये कार्तिक वदय व्‍दादशी दि.28 नोव्‍हे संध्‍या 5 वा श्रींनी अंत्री येथिल आईच्‍या टेकडीवर संजिवन समाधि धारण केली.

त्‍यांचे पुज्‍यपाद शिष्‍य स्‍वामी प्रेमानंद रामानंद स्‍वात्‍मानंद यांनी परमहंस पध्‍दतीने कापुर अगिर औषधी वनस्‍पती राळ लाख सभोवताली टाकुन समाधी वरील चिरा शंख नाद करुन उत्‍तरायण काळात विधीवन ठेवला त्‍यावर चिरेबंदी कातीव दगडाची सुंदर समाधी बांधली व त्‍यावरील मंदिराचे काम अनेक वर्षे सुरु होते.

अदमासे 1200 लोकसंक्ष्‍या असलेल्‍या अंत्री गावाच्‍या मध्‍यावर रेणुका आईची टेकडी आहे . तेथे पुरातन देवी मंदिर असुन त्‍यात कामाख्‍या शारदंबा पीठ संबोधतात त्‍याच्‍या लगत तिन्‍ही बाजुस काळया दगडात बांधलेली शुन्‍यागारे(गुहा) खास सोहं साधना ध्‍यान योग आभ्‍यासासाठी साधकास उपलब्‍ध आहेत सोहं साधनेस उपयुक्‍त आभ्‍यासपुर्ण रचना असलेली शुन्‍यागारीत बाहेरील तिव्र प्रकाश ध्‍वनी व वातावरण यांचा साधकास व्‍यत्‍यय येत नाही.

जगभरातुन या संजिवन समाधि सानिध्‍यात शुन्‍यागारात योगयाधना करण्‍यास साधक येत असतात. प्रति वर्षे कार्तिक वदय व्‍दादशीस येथे श्रींच्‍या संजिवन समाधी उत्‍सव होतो लाखे भाविक दर्शन ध्‍यान साधना व महाप्रसादाचा लाभ घेतात.

सन 2010 मध्‍ये श्रीमत्‍परमहंस भवान परमानंद नारायण सरस्‍वती संजिवन समाधी सोहळयास 100 वर्षे पुर्ण होत आहे. हंस जसा दुध व पाणी वेगळे करतो त्‍या प्रमाणे दै‍नदिन जिवनात सोहं साधकाने दुख:रुपी पाणी वेगळे करुन आनंद रुपी दुध प्राशन करावे असा दिव्‍य संदेश देणारे भगवान परमानंद यरणी संकल्‍प हंस होऊन परमानंद परमहंस चरणसेवा करण्‍याचा व संजिवन समाधी चरणी हंसोत्‍सव साजरा करण्‍याचा समस्‍त साधकांनी संकल्‍प केला आहे त्‍या प्रसं‍गी दिव्‍य सत्‍संग सोहम साधना व महाप्रसादाचे आयोजन करण्‍याचा मानस आहे. आपण सर्व त्‍या दिव्‍य सोहळयास सादर निमंत्रीत आहात.

हंस सोहम् पमरमानंद विश्‍वव्‍यापकम!!


   

ॐ नम हं शिव स गायत्री, आदिमाया, आदिशक्ति तुरयेअवस्‍थे ब्रम्‍हस्‍वरुपी       कुंडलनिस्थित सर्वशक्ति कामाक्षी भगवतेय नम: हरये नम: हरये नम: हरये नम:       ॐ श्रीमत्‍भगवान परमानंद नारायण सरस्‍वती ब्रम्‍हदत्‍त संजिवन चैतन्‍य       समाधिब्रम्‍ह चरणाय नम:       ॐ सोsहं, हंसाय, भगवान नारायण, सरस्‍वतेय नम:       ॐ हंसाय, परमांनद, स्‍वामी नारायण सरस्‍वती नम:       ॐ सोsहं, अलख निरंजन, सोहम हंसाय, ब्रम्‍हदत्‍ताय, परमानंदाय नम:       ॐ ब्रम्‍हदत्‍ताय, भिममुद्राय, बंधउड्डीयान, रुपपरमानंदाय नम:       ॐ सोsहं, जगतजननी, दत्‍तस्‍वरुपी, प्रभु परमानंदाय नम:       ॐ हंसरुपी, ज्ञानमुद्रा, महाकाय, सोहम् ध्‍वनी, प्रभु परमानंदाय नम:       ॐ आत्‍मरुपी नाग दर्शनाय, परमानंद महादेवाय नम:       ॐ अर्धनारीनटेश्‍वर, शिव, शक्तिस्‍वरुपी प्रभु परमानंदाय नम:       ॐ अनाहत सोहम् नाद, आत्‍मतेजाय, परमहंस परमानंदाय नम:       ॐ सोsहं आत्‍मानंदम, चैतन्‍यस्‍वरुपम्, भगवान परमानंदाय नम:       ॐ शक्तिमुद्राय, अखिल, अखिलांतक, ब्रम्‍हांडनायक नम:   &n      ॐ सोहंरुपी मुकुटधारी, अंतरंग जटाधारी सिध्‍दयोगी प्रभु परमानंदाय नम:       ॐ हंसाय वायुरुपी, महाकायरुपी, हनुमंत स्‍वरुपी प्रभु परमानंदाय नम:       ॐ सोsहं, व्‍याघ्रासनाधिष्‍टत्, श्रीमंतयोगी, जगतउध्‍दारी प्रभु परमानंदाय नम:       ॐ सोsहं, गजानन उध्‍दारी, आद्य गुरुस्‍थानी प्रभु परमानंदाय नम:       ॐ हंसाय, दासमधुसुदनाय, रचतजाय, लिन स्‍वरुपाय, अंतरंगशब्‍दे, योगेंद्र देहे       अंतरी जो वसत असे, परमदैवताय, परमानंद नारायण सरस्‍वती महादेवाय नम:       ॐ स्‍वयं सोहम् स्‍वरुपी, परमहंसयोगी, नाथपंथी, दत्‍तअवतारी, अंत्री निवासी,       शेषरुपी, महायोगी, प्रभुपरमानंदाय नम: