नारायण सरस्‍वती बोरगांव

भगवान श्रीमत्‍परमहंस नारायण सरस्‍वती व त्‍यांचे शिष्‍योत्‍तम भगवान परमानंद नारायण

भगवान श्रीमत्‍परमहंस नारायण सरस्‍वती हे महान साक्षात्‍कारी योगपट असे संन्‍यस्‍त महात्‍मा होत. भारत वर्षात भ्रमण करुन दाट वृक्ष झाडी व पुर्णा नदी प्रवाहाने समृध्‍द अशा सिल्‍लोड येथील बोरगांव बाजार बाबातगन या ग्रामी येऊन एकांत वास करीत तो काळ मुघल राजवटीचा 1700 ते 1800 होता तेथेच त्‍यांची संजिवन समाधी आहे.

आदयगुरु शंकराचार्यांच्‍या चारपीठांपैकी दक्षिणभारता मधील श्रृंगेरी पीठाचे ते परमहंस परिव्राजकाचार्य पराक्रमी संत होत. त्‍याची शिष्‍य परंपरा अत्‍यंत समृध्‍द होत संन्‍यस्‍थ व गृहस्‍थाश्रमी अनेक निवास त्‍यांनी ज्ञान देऊन सोहं साधनेच्‍या व आत्‍म साक्षात्‍काराच्‍या दिव्‍य मार्गावर मार्गस्‍थ केले. त्‍यांचे अनेक शिष्‍यांमधील शिष्‍योत्‍तम परमहंस सन्‍यस्‍थ स्‍वामी परामनंद नारायण सरस्‍वती नारायण सरस्‍वतींनी आपल्‍या समाधिप्रसंगी शिष्‍योत्‍तम स्‍वामी परमानंद यांना जवळ बोलाऊन सांगितले "बा परमांनदा तु आणि मी तेगळानसे तुझ्या नावापुढे माझे नारायण सरस्‍वती हे नाव धारण करुन आध्‍या‍त्‍मीक कार्य पुढे चालु ठेव". "आणि हो ज्‍योच मन मोकळे नसेल मनावर ताबा नसेल अशा साधकास अनुग्रह करु नकोस व अनुग्रह केल्‍यानेही जर त्‍या साधकाने अज्ञा पालन केलें नाही, मनावर ताबा ठेवला नाही तर त्‍यास दिलेली विदया अधिकार काढुन घे." तु मोठा पराक्रमी पुरुष नावारुपास येशील, माझी अखंड परंपरा पुढे चालवशील आत्‍म साक्षात्‍कारी सोहं साधनेच्‍या मार्गावार असंक्ष्‍या जिवांना मार्गदर्शक होशील त्‍यांचा उध्‍दार करशील अशी दिव्‍य भविष्‍यवाणी कुरवाळले स्‍वामींनी श्रींचे चरणकमल मस्‍तकी लावले व दोन दिव्‍य देह एक परामनंद रुपी ज्‍योतीत एकरुप झाले सदगुरु नारायण सरस्‍वतींना समाधि देऊन जिवब्रम्‍ह सेवार्थ भगवान परमानंद मार्गस्‍थ झाले.

त्‍यांचा दिव्‍य जिवन कार्य विश्‍वाची उत्‍पत्‍ती ज्‍या उर्जा शक्‍तीपासुन झाली त्‍याच्‍या स्‍पंदनातुन भगवान परमानंद अशा दिव्‍य सत्‍पुरुषाचा जन्‍म होत असतो वा त्‍या स्‍पंदनाशी ते सतत तादाल असतात व त्‍यातच ते विलीन होत असतात त्‍या मनाहद सोहं नादाचा प्रचार व प्रसार करण्‍यात आपले दिव्‍य जिवन काळ भगवान परमानंदानी समर्पित केला तो काळ पुढील प्रमाणे 12 वर्षे दहिठण (पैठण जवळील) 16 वर्षे पंजाब प्रांती व सध्‍याच्‍या पाकस्थानात असलेले हैदराबाद या राजा रामचंद्र दफ्तरदार यांच्‍या सह 6 वर्षे भारत भ्रमण चारधाम यात्रा 7 वर्षे करतवाडी 6 महिने नेतानशा, 6 वर्षे जाफराबाद 6 वर्षे वरुड 1 वर्षे आमसरी 7 वर्षे जळगांव 12 वर्षे पालखेड, 4 वर्षे सातेगांव सावंगी, 7 वर्षे कसबाखेड 3 वर्षे बेराळे 3 1/2 वर्षे अंबाशी 13 वर्षे अंत्री, अशी एकुण 114 वर्षांची यादी मिळते परंतु उपलब्‍ध फोटो वरुन अभ्‍यास करता श्रींचे वयोमान जास्‍त ही असु शकते. पवन अभ्‍यास सोहं साधना सिध्‍द रुढ योगीराज श्रीमत्‍परमहंस परानंद यांना ते सहजशक्‍य होते.

भगवान श्रीमत्‍परमहंस नारायण सरस्‍वती हे श्रृंगेरीपीठाचे परमहंस संन्‍यास्‍त्‍ा योगीराज होत. संपुर्ण कालखंडात त्‍यांनी अख्‍ांड भारत भ्रमण केले व जनमानसातील दुख: नैराश्‍य व भोगप्रवृत्‍ती अदयर्म यांचा जवळुन अभ्‍यास केला. मग पिठाचे नियम व त्‍यातील असण-या पारंपारीक विधी योगाभ्‍यास यांचा सुवर्ण मध्‍य काढुन अष्‍टांग योग नकारता ध्‍यानयोग मार्गाने सोहं साधना कशी करावी दैनंदीन जिवनात साधना कशी करावी सर्व प्रकारचे काम करतांना अनुसंधान कसे साधावे साधकाने कुठले नियम पाळावे कर्मकांड बाहय पुजा न करता मानसपुजा व ध्‍यान सत्‍संग करुन आनंदी जिवन व्‍यतित कसे करावे याविषयी आपल्‍या दिव्‍य वाणीत साध्‍ाकांस एकुण 14 उपदेश केले आहेत, त्‍यात कुठल्‍याही जाती धर्माचा पंथाचा व देश कालाचे निर्देशन न करता केवळ मानव जाती उध्‍दारासाठी सोहंची साधना करावी असे आदेशीत केले आहे व परमसद्गरुनाथ गजानंद महाराजांसह सर्व पुज्‍यपाद शिष्‍यांस हिच शिकवण दिली.

मानवाने जिवंतपणीच जिवन मु्क्‍तीचा सोहळा अनुभवावा देह आहे तेथेच अनुभुती आहे मोक्ष हा उधारीचा मरणेपरांत मिळणारा नसुन सदेह सजगतेने सोहं साधना करुन सदगुरुंवर श्रध्‍दा विश्‍वास ठेऊन साधकाने मुक्‍तीचा सोहळा अनुभवायाचा आहे. सोहं साधना करुन मन बुध्‍दी चित्‍त अहंकार हया अंतकरण चतुष्‍याची शय्या करुन(दमन) शुध्‍द चित्‍त चंद्राच्‍या शांत प्रकाशात तो अनुभवायाचा असतो. जो साधना योगाभ्‍यास करावयाचा तो तात्‍काळ करण्‍यास प्रारंभ करावा उदयाची गोष्‍ट कोण जोणतो असे श्री उपदेश करतात. योग अभ्‍यासाव्‍दारे प्राणजय करुन दिर्घायु झालेले व स्‍वत: संजिवन समाधी धारण करणारे भगवान परमानंद म्‍हणतात म्‍हणजेच दिर्घायु होता येते परंतु मन चित्‍ताची चंचलता व देहाची झिज थांबविता येत नाही. आपल्‍या देहाच्‍या निरोगी तरुण अवस्‍थेतच साधकाने या सोहं साधनेच्‍या दिव्‍य मार्गावर मार्गक्रमण करावे आत्‍म उध्‍दारासाठी सतत प्रयत्‍न करावेत. संकल्‍प विकल्‍पाचे चुर्ण करुन दृढ निश्‍चयाने साधना करावी चारवेद सहा शास्‍त्र अठरा पुराणे व इतर सर्व धर्माचा सखोल अभ्‍यास यांनी केला होता श्री म्‍हणतात हे सर्व आपणास ज्ञान देतात. अनुभुती तुम्‍ही स्‍वत: प्रयत्‍न पुर्वक मिळवायची आहे. श्‍वास घेतांना सोss व सोडतांना ssहंम श्‍वसन क्रियेवरच फक्‍त सोहंमची साधना नसुन ब्रम्‍हांडात व्‍यापुन असलेली दिव्‍य शक्‍ती श्‍वास आत घेऊन देहातील सं‍कुचित वृत्‍ती विकार वासना हंम् उश्‍वासाने बाहेर टाकणे व त्‍याच मत्राचे अनुसंधान साधने असे श्रीमत्‍परमहंस भगवान परमानंद साधकास उपदेश करतात या उच्‍चमत भावनेने साधकाने सोहं साधना करुन समस्‍त मानव जातीचा उध्‍दार करण्‍याकरता एकत्रीत येऊन विश्‍वरुप सोहं कुटुंबकम जगातील प्रत्‍येक देशातील जाती धर्माच्‍या माणवास आपल्‍या दिव्‍य प्रवाहात समाऊन घेतात.


   

ॐ नम हं शिव स गायत्री, आदिमाया, आदिशक्ति तुरयेअवस्‍थे ब्रम्‍हस्‍वरुपी       कुंडलनिस्थित सर्वशक्ति कामाक्षी भगवतेय नम: हरये नम: हरये नम: हरये नम:       ॐ श्रीमत्‍भगवान परमानंद नारायण सरस्‍वती ब्रम्‍हदत्‍त संजिवन चैतन्‍य       समाधिब्रम्‍ह चरणाय नम:       ॐ सोsहं, हंसाय, भगवान नारायण, सरस्‍वतेय नम:       ॐ हंसाय, परमांनद, स्‍वामी नारायण सरस्‍वती नम:       ॐ सोsहं, अलख निरंजन, सोहम हंसाय, ब्रम्‍हदत्‍ताय, परमानंदाय नम:       ॐ ब्रम्‍हदत्‍ताय, भिममुद्राय, बंधउड्डीयान, रुपपरमानंदाय नम:       ॐ सोsहं, जगतजननी, दत्‍तस्‍वरुपी, प्रभु परमानंदाय नम:       ॐ हंसरुपी, ज्ञानमुद्रा, महाकाय, सोहम् ध्‍वनी, प्रभु परमानंदाय नम:       ॐ आत्‍मरुपी नाग दर्शनाय, परमानंद महादेवाय नम:       ॐ अर्धनारीनटेश्‍वर, शिव, शक्तिस्‍वरुपी प्रभु परमानंदाय नम:       ॐ अनाहत सोहम् नाद, आत्‍मतेजाय, परमहंस परमानंदाय नम:       ॐ सोsहं आत्‍मानंदम, चैतन्‍यस्‍वरुपम्, भगवान परमानंदाय नम:       ॐ शक्तिमुद्राय, अखिल, अखिलांतक, ब्रम्‍हांडनायक नम:   &n      ॐ सोहंरुपी मुकुटधारी, अंतरंग जटाधारी सिध्‍दयोगी प्रभु परमानंदाय नम:       ॐ हंसाय वायुरुपी, महाकायरुपी, हनुमंत स्‍वरुपी प्रभु परमानंदाय नम:       ॐ सोsहं, व्‍याघ्रासनाधिष्‍टत्, श्रीमंतयोगी, जगतउध्‍दारी प्रभु परमानंदाय नम:       ॐ सोsहं, गजानन उध्‍दारी, आद्य गुरुस्‍थानी प्रभु परमानंदाय नम:       ॐ हंसाय, दासमधुसुदनाय, रचतजाय, लिन स्‍वरुपाय, अंतरंगशब्‍दे, योगेंद्र देहे       अंतरी जो वसत असे, परमदैवताय, परमानंद नारायण सरस्‍वती महादेवाय नम:       ॐ स्‍वयं सोहम् स्‍वरुपी, परमहंसयोगी, नाथपंथी, दत्‍तअवतारी, अंत्री निवासी,       शेषरुपी, महायोगी, प्रभुपरमानंदाय नम: